मुंबई : मनपाच्या हद्दीतील नालेसफाईचे कामे समाधानकारक झाली आहेत,मात्र शासकीय आणि निमशासकीय प्राधिकरणांच्या हद्दीतील नालेसफाईच्या कामात हयगय होत आहे. या कारणास्तव मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, संरक्षण खाते यासारख्या विविध प्राधिकारणांमध्ये नालेसफाईच्या कामांबाबत समन्वय आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांच्या आढाव्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
विविध प्राधिकरणांच्या हद्दीत असलेल्या नाल्यातील सफाई करण्यासाठी मनपाला परवानगी मिळत नाही. त्यामुळे या नाल्यातील सफाईबाबत शंका आहे. विविध शासकीय आणि निमशासकीय प्राधिकरणांच्या हद्दीत नालेसफाईचे काम योग्यरीत्या झाले नसल्यास नाले तुंबण्याचा धोका निर्माण होतो. या परिस्थितीत एकट्या मनपाला जबाबदार धरता येणार नाही. विविध प्राधिकरणांमध्ये नालेसफाईच्या कामाबाबत सुसूत्रीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाने तातडीने लक्ष द्यावे. जेणेकरून तुंबलेल्या नाल्यांचे खापर मनपाच्या माथी फोडले जाणार नाही, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. समुद्राच्या भरतीने काही वेळा नाल्यांमध्ये कचरा वाहून येतो. विमानतळ प्राधिकरणाने आपल्या हद्दीतील नाले रुंदीकरणास सहकार्य केले आहे. अशा प्रकारे विविध प्राधिकरणांकडून सहकार्य अपेक्षित आहे. योग्य त्या समन्वयाद्वारेच नालेसफाई व्यवस्थित होऊन मुंबईला पुराच्या धोक्यापासून वाचवता येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. वांद्रे-कुर्ला संकुलातील नवीन टेलिफोन पुलाजवळ मिठी नदीच्या पात्रातील नालेसफाई, क्रांतीनगर पूल, सोमय्या नाला, पंतनगर येथील लक्ष्मीबाग नाला, बॉम्बे ऑक्सिजन नाला आणि पूर्व उपनगरातील नऊ नाल्यांतील सफाईची उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. या वेळी महापौर सुनील प्रभू, सभागृह नेते यशोधर फणसे यांच्यासह पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.
५५ ते ६0 टक्के नालेसफाईमुंबईत आतापर्यंत मोठय़ा नाल्यांची ५५ ते ६0 टक्के सफाई झाली आहे. तसेच एमएमआरडीए हद्दीतील मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम पालिकेने १५ मे पासून सुरू केले आहे. मिठी नदीतून आतापर्यंत ३0 ते ३५ टक्के गाळ काढल्याचे संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प, प्रभारी) लक्ष्मण व्हटकर यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment