धारावी पुनर्विकास प्रकल्पाला बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 May 2013

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी


मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मागवण्यात आलेल्या सूचना व हरकतींमध्ये पुनर्विकास प्रकल्पाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष बाबुराव माने यांनी दिली. त्याचबरोबर ४00 चौ. फुटांचे घर हवेच, ही मागणीही या जनसुनावणीच्या वेळेस ठळकपणे अधोरेखित करण्यात आले असल्याचेही माने यांनी सांगितले. 

धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडून धारावीचा प्रारूप आराखडा दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यावर धारावीकरांच्या सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्याबाबतची जनसुनावणी बुधवारी पार पडली. या आराखड्यासंदर्भात ७00हून अधिक सूचना प्राप्त झाल्या असून यामध्ये धारावी पुनर्विकासाचे नामांतर तसेच एसआरए आणि धारावी पुनर्विकासाच्या नियमातील साम्य, यावर हरकती दर्शवण्यात आल्या आहेत. धारावीमध्येच संक्रमण शिबिरांची उपलब्धता तसेच ४00 फुटांचे घर अशा विविध मागण्या, सूचना व हरकती मांडण्यात आल्या आहेत. या जनसुनावणीत धारावीकरांच्या मागण्या आक्रमकपणे दर्शवण्यात आल्या. या मागण्या मान्य न केल्यास धारावीकर रस्त्यावर उतरतील, असेही माने यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad