पालिकेची थकीत रक्कम मिळण्यास अडचण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 May 2013

पालिकेची थकीत रक्कम मिळण्यास अडचण


मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे राज्य शासनाकडे २ हजार ६00 कोटी रुपये थकीत असून या रकमेच्या वसुलीसाठी पालिकेने शासनाच्या नगर विकास खात्याच्या सचिवांशी चर्चा केल्यानंतरही थकीत रक्कम देण्याबाबत शासनाकडून अर्थसंकल्पात तरतूद केली नसल्यामुळे ती मिळणे पालिकेला अशक्य होत चालले आहे. राज्य शासनाच्या मालमत्ता कर, पाणीपुरवठा, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शासनाच्या काही योजना राबवल्या जातात. त्याचे पैसे थकीत आहेत. तसेच शैक्षणिक अनुदान आणि वित्त विभागाकडे अशा विविध विभागांकडे मिळून २ हजार ६00 कोटी रुपये थकीत आहेत. ती थकीत पैसेवसुलीसाठी पालिकेने अधिकारी नेमले आहेत. शासनाकडून विविध विभागांचा समन्वय नसल्याने हा समन्वय साधण्याचा प्रयत्न हे अधिकारी करणार असून प्रत्येक विभागाच्या थकीत रकमेविषयी माहिती देऊन ही थकीत रक्कम कशा पद्धतीने वसूल केली जाऊ शकते, याची माहिती हे अधिकारी शासनाला देणार आहेत. पालिकेच्या पाठपुराव्यामुळे शासनानेही नेमलेल्या त्या-त्या विभागांच्या अधिकार्‍यांना घेऊन पालिका अधिकार्‍यांकडून नगर विकास सचिवांशी बैठक घेण्यात येऊन त्या थकीत रकमेबाबत चर्चा केली गेली असून लवकरच ती रक्कम पालिकेला मिळेल, असा विश्‍वास प्रमुख लेखापाल राम धस यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad