अनावश्यक एसएमएस, कॉल वाढले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2013

अनावश्यक एसएमएस, कॉल वाढले


DND

रिअल इस्टेटमध्ये नवे प्रोजेक्ट, गुंतवणुकीवर चांगले रिटर्न, सुट्टीत रिसॉर्टच्या ऑफर आदींचे प्रमोशन करणारे अनावश्यक एसएमएस पुन्हा मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत; तसेच केवळ कंपन्यांकडूनच नव्हे, तर काही अनोळखी सामाजिक संस्थांकडून देणगी देण्याची मागणी करणारे फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे. 

टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियानेही (ट्राय) हे मान्य केले आहे. अशा प्रकारचे कॉल, एसएमसबाबत तक्रारी वाढल्या आहे. काही इन्शुरन्स कंपन्यांचे एजंट गुंतवणूक आणि प्रोटेक्शन प्लॅनसाठी फोन करू लागले आहेत. 

यामुळे कारवाईची, दूरसंचार कंपन्यांनी नोंदणी नसणाऱ्या टेलिमार्केटिंग कंपन्यांबाबतीत अधिक सजग राहण्याची गरज आहे. प्रमोशन कॉलनी मर्यादा ओलांडली आहे. ट्राय लवकरच याबाबत नियम जारी करेल, असे ट्राय चे अध्यक्ष राहुल खुल्लर यांनी सांगितले. ट्राय ने काही आठवड्यांपूर्वी नियम कडक करूनही हे सुरू आहे. डू नॉट कॉल रजिस्ट्रीमध्ये क्रमांक नोंदल्या गेलेल्या यूजरना कॉल वा मेसेज पाठवू नये, असा आदेश ट्राय ने यापूर्वीच जारी केलेला आहे. रिअल इस्टेट प्रोजेक्ट व सोना बेल्टचे प्रमोशन फोनवरून करण्यावरही ट्राय ने बंधने घातलेली आहेत. प्रमोशनचे एसएमएस वा फोन घेण्याची इच्छा असलेल्याना केवळ नोंदणीकृत टेलिमार्केटर कंपन्या कॉल वा एसएमएस करू शकतात. 

सिस्टीमबाहेरच्यांकडून हे होत असल्याने प्रश्न निर्माण झाले आहे, असे मोठ्या दूरसंचार कंपनीत काम करीत असलेल्याने सांगितले. टेलिमार्केटिंग कंपन्या म्हणून नोंदणी झाल्यास बंधने पाळावी लागतात. मात्र, असे न केल्याने कोणतीही बंधने येत नाहीत व आपल्या मर्जीनुसार वागता येते आणि नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांमुळे प्रश्न निर्माण होत आहे, असे त्याने नमूद केले. 

यूजर किती फॉलोअप घेतात? 
अनावश्यक एसएमएस किंवा कॉल आल्यास संबंधित टेलिमार्केटिंग कंपनीला ब्लॉक करण्यासाठी यूजरने तो नंबर वा एसएमएस १९०९ वर फॉरवर्ड करावा. मात्र, असे किती लोक करतात? जे यूजर करतात ते दूरसंचार कंपनीकडे याचा पाठपुरवा करतात का? दूरसंचार कंपनीकडे दहा तक्रारी दाखल केल्यावर सर्वच्या सर्व तक्रारींचे निवार होत नाही. त्यामुळे टेलिमार्केटिंग कंपन्या या सिस्टीममध्ये सापडत नाही व मेसेज येणे कायम राहते. 

बंद करण्यासाठी काय करावे? 
अनावश्यक कॉल बंद करण्यासाठी यूजर १९०९ डायल करू शकतात आणि त्यानुसार दोन प्रकारांत नोंदणी करता येते. व्यावसायिक एसएमएस किंवा कॉल पूर्णपणे बंद करा वा कशाप्रकारचे एसएमएस हवे आहेत, याचा तपशील देता येतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad