मुंबई - महापालिकेच्या पश्चिम उपनगर इमारत प्रस्ताव विभागातून तब्बल ३१४ फायली गहाळ झाल्याची बाब उघड झाली आहे. इमारत प्रस्ताव विभागाच्या वांद्रे येथील कार्यालयातून या महत्त्वाच्या फायली गायब झाल्या असून याबाबत पोलीस ठाण्यात एफआयआरही नोंदविण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यता येत आहे. या फायलींचा शोध घ्यावा, अन्यथा दोषी अधिकार्यांवर कारवाई करा असे परिपत्रकच आयुक्त सीताराम कुंटे यांनी काढले आहे.
पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागात इमारतीच्या बांधकामांबाबत महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फाइल्स असतात. इमारतींना सीसी, ओसी देण्यासंबंधीचे व्यवहार या विभागात पार पडतात. यासंबंधीची महत्त्वाची कागदपत्रेच गहाळ झाली आहेत.
१९९१ ते २००९ या कालावधीत तब्बल ३१४ फायली गहाळ झाल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी या कायद्याखालील काढलेल्या माहितीत हे उघड झाले आहे. याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात पालिकेच्या संबंधित विभागाकडून तक्रार पत्र देण्यात आले, मात्र यावर एफआयआर दाखल झालेला नाही.
या प्रकरणात एखादा अधिकारी दोषी आढळल्यास त्याला दहा हजार रुपये दंड अथवा पाच वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. काही प्रकरणाला दोन्ही प्रकारे कारवाईची तरतूद आहे.
No comments:
Post a Comment