दरवर्षी ७.१ दशलक्ष मृत्यूमुंबई : हाय ब्लडप्रेशर या व्याधीचे नाव वैद्यकीय क्षेत्रातील नाव हायपर टेन्शन आहे. म्हणजेच उच्च रक्तदाब याचाच अर्थ असा होतो की, रुग्णाचा रक्तदाब १४0/९0 एमएम एचजी या सर्व साधारण पातळीपेक्षा सातत्याने अधिक असतो. जागतिक स्तरावरील या आजाराच्या अंदाजित आकडेवारीनुसार १ दशलक्षपेक्षा थोडे अधिक इतक्या रुग्णांमध्ये हा आजार आहे. दरवर्षी अंदाजे ७.१ दशलक्ष मृत्यूसाठी उच्च रक्तदाब कारणीभूत असतो. विशेष म्हणजे या आजाराची सहजपणे जाणवतील अशी कोणतीही लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत नाहीत आणि बहुतेक रुग्णांमध्ये हा पुढच्या टप्प्यात गेल्यानंतर या आजाराचे निदान होते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या आजारास सायलेंट किलर म्हटले जाते, यात नवल काही नाही. एशियन हार्ट इन्स्टिट्युटमधील इंटरव्हेन्शल कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डिओजी विभागाचे प्रमुख डॉ. तिलक सुवर्णा यांनी उच्च रक्तदाबाबत माहिती देताना सांगितले की, उच्च रक्तदाब हा वैद्यकीयदृष्ट्या आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचा प्रश्न होऊ पाहत आहे. व्यक्तीचे वय जसजसे वाढत जाईल, तसतसा उच्च रक्तदाबाचा त्रास हा जवळ जवळ अपरिहार्य ठरत आहे. वाढत्या वयानुसार या आजाराचा प्रादुर्भावही वाढत असून ६0 ते ६९ या वयातील ५0 टक्के रुग्णांमध्ये आणि ७0 किंवा अधिक वयाचा अंदाजे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये ही समस्या आढळते. किंबहुना ५५ ते ६५ वर्षे वयापर्यंत उच्च रक्तदाब नसणार्या पुरुष आणि महिलांमध्ये हा आजार उद्भवण्याची शक्यता अंदाजे ९0 टक्के इतकी असते. उच्च रक्तदाबाच्या या समस्येवर अपुरे उपचार झाले किंवा अजिबातच उपचार केले नाहीत तर त्यामुळे पुढे हृदयविकार, स्ट्रोक, मूत्रपिंडाचे आजार आणि डोळ्यांवर परिणाम होणे, यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. उच्च रक्तदाब हे हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याचे एक स्वतंत्र कारण असून त्यामुळे हृदयविकाराचा धोका तिपटीने वाढू शकतो. उच्च रक्तदाबावर उपचार करताना दैनंदिन जीवनशैलीमध्ये बदल करण्यापासून सुरुवात होते. जसे की, दैनंदिन आहारामधील आरोग्यदायी बदल, शारीरिक व्यायामामध्ये वाढ आणि वजनातील घट या सर्वांसह औषधोपचारही केले जातात. उच्च रक्तदाबरोधक उपचार पद्धतीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात २0 ते २५ टक्के इतकी घट झाली आहे. तसेच हृदय बंद पडण्याच्या घटनाही सरासरी ५0 टक्क्यांपेक्षा कमी झाल्या आहेत. |
Post Top Ad
18 May 2013
Home
Unlabelled
रक्तदाबाचा आजार ठरतोय सायलेंट किलर
रक्तदाबाचा आजार ठरतोय सायलेंट किलर
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment