शिवसैनिकांमध्ये जोश भरण्यासाठी महाराष्ट्र दिनाच्यामुहूर्तावर शिवसेनेने घेतलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातच पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली.शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांनीमेळाव्याच्या मंचावरूनच पक्षातील हितशत्रूंवर तोफडागली आणि शिवसेनेची काँग्रेस होत असल्याचीबोचरी टीका केली .
माजी विरोधी पक्षनेते असलेले रामदास कदम हेत्यांच्या जहाल भाषणासाठी ओळखले जातात . जाहीरसभेत विरोधकांवर बिनधास्त तोफ डागणाऱ्या कदमयांच्या भाषणाला शिवसैनिकांचा तुफान प्रतिसादमिळतो . गटप्रमुखांच्या मेळाव्यातही रामदास कदम काँग्रेस - राष्ट्रवादीसह मनसेवर तुटून पडतील ,अशी अपेक्षा होती . मात्र , आज त्यांनी स्वपक्षातील विरोधकांनाच लक्ष्य केले . शिवसेनेतआपल्याविरुद्ध चाललेल्या कारस्थानांचा त्यांनी समाचार घेतला .
' रामदास कदम शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये , काँग्रेसमध्ये किंवा मनसेत जाणार , शिवसेनेशीगद्दारी करणार , अशा अफवा पक्षातील काही मंडळी पसरवत आहेत . ही माणसे कोण आहेत ते मलाचांगले ठाऊक आहे . उद्धव ठाकरे यांच्याकडे मी त्यांची नावानिशी तक्रार करणार आहे ,' असा इशारात्यांनी यावेळी दिला . ' शिवसेनेची काँग्रेस होत आहे , हा धोका ओळखा ,' अशी सूचनाही त्यांनी केली. ' दादर , गिरगाव , लालबागमधील पराभव पक्षातील हुषार व बुद्धिवान नेते का रोखू शकले नाहीत ,'असा सवालही त्यांनी केला . विशेष म्हणजे नारायण राणे यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्यापूर्वीएका मेळाव्यात अशीच जाहीर टीका केली होती , याचे स्मरण याप्रसंगी शिवसैनिकांना झाले
No comments:
Post a Comment