मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी होणार्या अपघातांचा विचार करता स्थानिक पोलीस ठाण्याकडून याबाबतची आकडेवारी संकलित करून येत्या काळात १४ ठिकाणी पादचारी पूल उभारणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. चेंबूर येथील शीव-ट्रॉम्बे या अतिशय वर्दळीच्या परिसरातील विठ्ठल नारायण पुरव मार्गावरील लाल डोंगर प्रवेशद्वाराजवळील पादचारी उड्डाणपुलाच्या पायाभरणी सोहळय़ाच्या वेळी शेवाळे यांनी याबाबतची माहिती दिली.
नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन लाल डोंगर प्रवेशद्वाराजवळील पादचारी उड्डाणपुलाचा आराखडा बनवण्यात आला आहे. सीआरझेड आणि इतर कारणांमुळे काही पुलांचे बांधकाम अद्यापि सुरू करता आले नाही. या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाचे प्रय▪आहेत. त्या दूर करून लवकरच या पुलांचे काम मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन या वेळी शेवाळे यांनी दिले. चेंबूर येथील नाट्यगृह निर्मितीकरिता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसेच चेंबूर येथील जलतरण तलावाच्या अत्याधुनिकीकरणाबाबत निविदा मागवण्याचे शेवाळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment