मोबाइल फोन जास्त वापर करणाऱ्यांसाठी किंवा सतत फिरतीवर असलेल्यांसाठी खूषखबर असून केवळ २० ते ३० सेकंदात मोबाइल पूर्णपणे चार्ज करू शकेल, अशा सुपर-कॅपॅसिटर उपकरणाचा शोध एका १८ वर्षीय भारतीय-अमेरिकन मुलीने लावला आहे. कॉलिफोर्नियात राहणा - या ईशा खरे हिने ही कामगिरी केली असून त्यासाठी तिला इंटेल फाऊंडेशनच्या ' यंग सायंटिस्ट अॅवॉर्ड ' ने गौरवण्यात आले आहे.
या कामगिरीबद्दल ईशाला इंटेलकडून ५० हजार डॉलर्सचे पारितोषिक मिळाले आहे. त्याशिवाय टेक्नॉलॉजी क्षेत्रातील बडी कंपनी ' गूगल ' नेही तिच्या या क्रांतिकारी संशोधनाची दखल घेतली आहे. ईशाच्या या उपकरणाचे आयुष्य १० हजार चार्ज-रिचार्ज सायकलएवढे आहे. मोबाइलच्या सामान्य बॅटरीचे आयुष्य एक हजार सायकल्स असते. त्यामुळे ईशाने बनवलेले उपकरण मोबाइल चार्जिंगसाठी फारच क्रांतिकारी ठरणार आहे.
ईशाच्या या सुपर-कॅपॅसिटरची चाचणी सध्या फक्त एलईडी दिव्यांवरच करण्यात आली आहे. मात्र, मोबाइल फोन व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्येही हे उपकरण वापरता येणार आहे. ' हा सुपर-कॅपॅसिटर लवचिक असल्याने कपड्यांमध्ये किंवा गुंडाळता येणाऱ्या डिस्प्लेमध्येही त्याचा वापर करता येऊ शकेल. बॅटरीच्या तुलनेत त्याचे अनेक वापर आणि उपयोग आहेत, ' असे ईशाने सांगितले. ईशाच्या संशोधनाचा कारच्या बॅटरीमध्येही वापर करता येऊ शकतो, असे इंटेलचेही म्हणणे आहे.
सुपर-कॅपॅसिटर कसा आहे ?

अत्यंत लहान आकाराचा हा सुपर-कॅपॅसिटर एनर्जी स्टोरेज डिव्हाइस असून तो मोबाइलच्या बॅटरीमध्ये बसवता येतो. अत्यंत कमी जागेत भरपूर ऊर्जा साठवून ठेवण्याची, चटकन चार्ज करण्याची क्षमता ही या सुपर-कॅपॅसिटरची वैशिष्ट्ये आहेत.
No comments:
Post a Comment