१२ हजार रिक्त पदे ३ महिन्यात भरावित - महापौर
मुंबई / अजेयकुमार जाधव :
मुंबई महानगर पालिकेमधील रिक्त असलेल्या १९ हजार मागासवर्गीयांच्या राखीव जागेवर जर मागासवर्गीय उमेदवार उपलब्ध नसतील तर ही पदे रिक्त न ठेवता त्या-त्या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार मिळेपर्यंत तात्पुरती पदे भरण्यात यावीत अशी मागणी भाजपचे नगरसेवक विनोद शेलार यांनी केल्याने मागासवर्गीय समाजातील रिक्त जागांवर इतर उमेदवारांना नोकर्या लागणार असून यामुळे मागासवर्गीयांच्या नोकऱ्या धोक्यामध्ये आल्या आहेत. भाजपा नगरसेवक विनोद शेलार यांच्या मागणीमुळे मागासवर्गीय उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून महापौर सुनील प्रभू यांनी सुद्धा या मागणीला होकार दिल्याने मागासवर्गीयांची पालिकेमध्ये १९ हजार रिक्त पदांची भरती होणार कि नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे.
मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी सोमवारी महापालिकेच्या भरती प्रक्रियेच्या संदर्भात नगरसेवक विनोद शेलार यांच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाबरोबर संयुक्त सभा घेतली. याप्रसंगी बोलताना महापौर सुनील प्रभू यांनी सध्या महानगर पालिकेत रिक्त असलेल्या सुमारे १८ हजार ४७२ जागांपैकी अत्यंत आवश्यक असलेल्या १२ हजार कर्मचार्यांची भरती येत्या तीन महिन्यांत पूर्ण करावी. त्याचप्रमाणे खाडा बदली कामगार घेण्याच्या सूचनाही या वेळी महापौरांनी केल्या.
मुंबई महानगरपालिकेच्या रिक्तपदांचा नागरी सेवा-सुविधांवर परिणाम होत असने नगरसेवक विनोद शेलार यांनी हा मुद्दा हरकतीचा मुद्दा म्हणून सभागृहात उपस्थित केला होता. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, पर्जन्य जलवाहिन्या, आरोग्य, शिक्षण, अग्निशमन, रुग्णालये इत्यादी विविध विभागांमध्ये असलेल्या रिक्त पदांविषयी महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोमवारी चर्चा झाली. आरोग्य सेवा, स्वच्छताविषयक सेवा आणि पाणीपुरवठा या अत्यंत महत्त्वांच्या सेवेवर महापालिका कर्मचारी कमी असल्याने परिणाम होत असतो. तेव्हा कर्मचार्यांची भरती करणे आवश्यक असल्याचेही शेलार यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे महापालिकेची भरती करताना आगाऊ नियोजन करून प्रत्येक वर्षाचा कर्मचारी भरती करण्याचा कार्यक्रम तयार करावा जेणेकरून वेळेवर कर्मचार्यांची भरती करणे शक्य होईल. म्हणजे ज्या वर्षातील भरती त्याच वर्षी पूर्ण करता येईल. जेणेकरून नागरी सेवा-सुविधेचा ताण इतर कर्मचार्यांवर पडणार नाही, असेही शेलार यांनी या वेळी सांगितले. लिपीक आणि शिक्षकांचीही भरती करण्याचे आदेश या वेळी महापौरांनी दिले. मुंबईच्या लोकसंख्येचा विचार करता रिक्त पदे भरून नागरी सेवा-सुविधांवर पडणारा ताण कमी करावा, असेही महापौर म्हणाले. नवीन रुग्णालये, मैदाने आणि इतर ठिकाणी कर्मचारी पुरवण्यासाठी बाहेरील व्यक्ती किंवा संस्थेचे सहकार्य घेण्यात यावे, असे प्रतिपादनही या वेळी महापौरांनी केले. |
No comments:
Post a Comment