मेरिटनेशनचा ऑनलाइन कोर्स - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2013

मेरिटनेशनचा ऑनलाइन कोर्स

मुंबई : मेरिटनेशनने आपल्या ऑनलाइन कोर्सेसची संपूर्ण श्रेणी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. गणित, विज्ञान, इंग्रजी आणि हिंदीकरिता असलेल्या या ऑनलाइन कोर्सेसमध्ये मल्टिमीडियाविषयक प्रकरणे, उजळणीकरिता असलेल्या नोट्स, प्रकरणनिहाय सराव चाचण्या आणि नमुना चाचण्या यांचा समावेश आहे. महाराष्ट्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांना आता फॉरमॅटिव्ह असेसमेंट या मेरिटनेशनच्या मूल्यांकन इंजिनचे लाभ मिळणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या कमजोर बाजू शोधून काढणे आणि त्यात सुधारणा करणे हे या इंजिनचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, विद्यार्थी टेस्ट जनरेटर टूलच्या साहाय्याने गणित/विज्ञानाच्या पुस्तकातील विशिष्ट प्रकरणांवर आधारित कस्टमाईज्ड चाचण्यांच्या साहाय्याने सराव करू शकणार आहे. या टूलच्या साहाय्याने महाराष्ट्र अभ्यास मंडळाच्या विज्ञान किंवा गणित विषयाच्या अभ्यासक्रमातील प्रकरणे निवडून अर्मयाद चाचण्यांची निर्मिती करता येऊ शकणार आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना वेदिक गणित या मॉड्यूलचे लाभ मिळवता येणार आहे. तसेच मजेदार गेम फॉरमॅटमध्ये प्रश्नमंजुषेच्या स्वरूपातून सामान्य ज्ञान वाढवण्याकरिता जी. के. मॉड्यूलचा वापर करता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad