मुंबई : एसटी कामगारांसाठी लागू करण्यात येणार्या २0१२-१६ वेतन कराराची अंमलबजावणी गेल्या दोन महिन्यांपासून झालेली नाही, त्यामुळे कर्मचार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. कामगारांचा वेतन करार लवकरात लवकर लागू करण्यात यावा, अन्यथा संपावर जाण्याचा इशारा विविध सहा कामगार संघटनांच्या कृती समितीने दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील जनतेला एसटीमध्ये होणार्या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळातील सन २0१२-१६ या चार वर्षांच्या कालावधीसाठी वेतन कराराची घोषणा करण्यात आली आहे. मात्र दोन महिने उलटल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे महामंडळातील एक लाखांहून अधिक कर्मचार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. अशा वेळी राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्टाईब राज्य परिवहन कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन आणि महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस या विविध संघटनांनी कामगारांच्या हक्कासाठी एकत्रित येऊन कृती समितीची स्थापना केली आहे.

No comments:
Post a Comment