तेवीस वर्षे पाकिस्तानातील कोट लखपत तुरुंगात कैदेत असलेल्या भारतीय नागरीक सरबजितचा अखेर लाहोर येथील जिना रुग्णालयात बुधवार मध्यरात्री सव्वाच्या सुमारास मृत्यू झाला. 'जिओ टीव्ही'ने ही बातमी सगळ्यात आधी ब्रेक केली. त्यानंतर सरबजितवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. सरबजीतचे शवविच्छेदन गुरुवारी करण्यात येणार असून त्यानंतर त्याचे पार्थिव शरीर भारताकडे सोपवण्यात येणार असल्याचे पाकिस्तानातील सूत्रांनी सांगितले. भारतीय उच्चायुक्त अधिकारी पाकिस्तानात रवाना झाले असून ते थोड्याच वेळात तेथे पोहचणार आहेत.
सरबजितचे पार्थिव जिन्ना रुग्णालयातून अल्लामा इकबाल रुग्णालयात आणण्यात आले असून तेथे त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, देशाच्या वतीने मी सरबजितच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. सरबजितचा मृतदेह भारतात आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. सरबजितचे कुटुंबिय म्हणतील तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिंदे म्हणाले, पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांच्याशी चर्चा केली आहे. सरबजितचा दहशतवादी कारवायांमध्ये कोणताही संबंध नव्हता. त्याच्या कुटुंबियांना आश्वसन देण्यात आले आहे की, गरज पडल्यास हेलिकॉप्टरने त्याचा मृतदेह भारतात आणला जाईल.
सरबजितची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे बुधवारी त्याची बहीण, पत्नी आणि दोन्ही मुली पाकिस्तानातून परत आल्या होत्या. वाघा बॉर्डरवर असतानाच सरबजितची बहीण दलबीर कौर यांनी भारत सरकार मदत करत नसल्याचा आरोप केला होता. माझ्या भावाचे काही बरे-वाईट झाल्यास अशी परिस्थिती निर्माण करीन की, मनमोहन सिंग यांना तोंड दाखवण्यास जागा उरणार नाही, असा इशाराही दलबीर यांनी दिला होता.
दरम्यान, 28 ऑगस्ट 1990 रोजी चुकून पाक सीमा ओलांडलेल्या सरबजीतला पाकिस्तानी सैनिकांनी अटक केली होती. सरबजित भारतीय गुप्तहेर असल्याचा त्याच्यावर आरोप होता. सरबजित तेव्हापासून पाकिस्तानी तुरुंगात होता. त्यानंतर त्याच्यावर लाहोरमध्ये स्फोट घडवून आणण्याचाही आरोप ठेवण्यात आला. त्याला 1991 फाशीचीही शिक्षा सुनावण्यात आली होती. सरबजितला अटक झाली होती तेव्हा त्याची लहान मुलगी पूनम केवळ 23 दिवसांची होती तर मोठी मुलगी सपनदीप तीन वर्षांची होती.
पाकिस्तानातील कोट लखपत तुरुंगात भारतीय कैदी सरबजीतसिंगवर गेल्या शुक्रवारी काही कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात सरबजितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जिना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. तो कोमात गेला होता. प्रकृती स्थिर होईपर्यंत कोणतीही शस्त्रक्रीया करणे अशक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. यासंदर्भात वाणिज्यदूतांना त्याची भेट घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारताने केली आहे.
सरबजितला एका कोठडीतून दुस-या कोठडीत हलवाताना हा हल्ला झाला. त्याची व इतर कैद्यांची कुठल्यातरी गोष्टीवर बाचाबाची झाली होती.त्यानंतर पाच कैद्यांनी तिथेच पडलेल्या विटांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांची चौकशी सुरु करण्यात आली होती.
सरबजितचे पार्थिव जिन्ना रुग्णालयातून अल्लामा इकबाल रुग्णालयात आणण्यात आले असून तेथे त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, देशाच्या वतीने मी सरबजितच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. सरबजितचा मृतदेह भारतात आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. सरबजितचे कुटुंबिय म्हणतील तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिंदे म्हणाले, पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांच्याशी चर्चा केली आहे. सरबजितचा दहशतवादी कारवायांमध्ये कोणताही संबंध नव्हता. त्याच्या कुटुंबियांना आश्वसन देण्यात आले आहे की, गरज पडल्यास हेलिकॉप्टरने त्याचा मृतदेह भारतात आणला जाईल.
सरबजितची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे बुधवारी त्याची बहीण, पत्नी आणि दोन्ही मुली पाकिस्तानातून परत आल्या होत्या. वाघा बॉर्डरवर असतानाच सरबजितची बहीण दलबीर कौर यांनी भारत सरकार मदत करत नसल्याचा आरोप केला होता. माझ्या भावाचे काही बरे-वाईट झाल्यास अशी परिस्थिती निर्माण करीन की, मनमोहन सिंग यांना तोंड दाखवण्यास जागा उरणार नाही, असा इशाराही दलबीर यांनी दिला होता.
दरम्यान, 28 ऑगस्ट 1990 रोजी चुकून पाक सीमा ओलांडलेल्या सरबजीतला पाकिस्तानी सैनिकांनी अटक केली होती. सरबजित भारतीय गुप्तहेर असल्याचा त्याच्यावर आरोप होता. सरबजित तेव्हापासून पाकिस्तानी तुरुंगात होता. त्यानंतर त्याच्यावर लाहोरमध्ये स्फोट घडवून आणण्याचाही आरोप ठेवण्यात आला. त्याला 1991 फाशीचीही शिक्षा सुनावण्यात आली होती. सरबजितला अटक झाली होती तेव्हा त्याची लहान मुलगी पूनम केवळ 23 दिवसांची होती तर मोठी मुलगी सपनदीप तीन वर्षांची होती.
No comments:
Post a Comment