नवी दिल्ली : देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना प्रशासकीय यंत्रणेवर ताणही वाढत चालला आहे. असे असतानाही भारतात तब्बल दीड हजार आयएएस अधिकार्यांची पदे रिक्त असल्याचे सरकारने गुरुवारी सांगितले आहे. आतापर्यंत ६ हजार २१७ पदांना मंजुरी मिळालेली असल्याचेही सरकारने म्हटले आहे.
आयएएस आणि आयपीएस अधिकार्यांचा तुटवडा असल्यामुळे देशातील विविध भागांमध्ये प्रशासकीय कामे मोठय़ा प्रमाणावर खोळंबली आहेत. त्यातच एका अधिकार्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. अशी परिस्थिती असतानाही देशात आयएएस अधिकार्यांची भरती करण्याबाबत भारत सरकार उदासीन असल्याचे दिसत आहे. अद्यापही दीड हजार आयएएस अधिकार्यांची पदे भरणे बाकी आहे. कर्मचारी, लोकतक्रार आणि पेन्शन राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ११९, मध्य प्रदेशात १0५ आणि बिहारमध्ये ९0 पदे रिक्त आहेत. याशिवाय झारखंडमध्ये ८४ आणि आंध्र प्रदेश व अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी ७८ पदांची भरती करणे बाकी आहे. दुसर्या एका प्रश्नाला उत्तर देताना नारायणसामी म्हणाले की, २0१२ मध्ये केंद्रीय सतर्कता आयोगाला भ्रष्टाचाराच्या २९ हजार ५00 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय गेल्या वर्षात २८ हजार ७५५ सामान्य तक्रारी आणि ८0४ व्हिसल ब्लोवरच्या तक्रारी मिळाल्या आहेत. २0११ मध्ये सतर्कता आयोगाला १७ हजार ८३0 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
Post Top Ad
03 May 2013
Home
Unlabelled
आयएएस अधिकार्यांची दीड हजार पदे रिक्त
आयएएस अधिकार्यांची दीड हजार पदे रिक्त
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment