शैक्षणिक वस्तू वेळेत देण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे शिक्षण समिती अध्यक्षांचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 May 2013

शैक्षणिक वस्तू वेळेत देण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे शिक्षण समिती अध्यक्षांचे आदेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या २७ शैक्षणिक वस्तू शाळा सुरू झाल्याबरोबर मिळाव्यात यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ते नियोजन करावे, असे आदेश मंगळवारी शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांनी दिले.

पालिका प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तू दरवर्षी देण्यात येतात, मात्र या वस्तू कधीच वेळेवर विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने ओरड होते. याची संधी साधत कंत्राटदारांकडून निकृष्ट वस्तू पुरवण्याचा प्रकार घडतो. हे टाळण्यासठी या वर्षी या २७ शैक्षणिक वस्तू वेळेवर शाळा सुरू झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करावे, असे आदेश कोटक यांनी दिले आहेत. शैक्षणिक वस्तू वाटपासंदर्भात आपण प्रशासनाला कळवले असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात या वस्तू कधी येतील याबाबतची तारीख प्रशासनाकडून कळवली जाणार असल्याचे कोटक यांनी स्पष्ट केले. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना २७ शैक्षणिक वस्तूंऐवजी थेट पैसे देण्याची मागणी मनसेकडून झाली होती. याबाबत पालिका आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याचे सूचित केले होते, मात्र २७ वस्तू पुरवणार्‍या कंत्राटदाराबरोबर दोन वर्षांचा करार पालिकेने केल्याने या वर्षी पैसे देणे अशक्य असल्याचे कोटक यांनी स्पष्ट केले.

दुधाऐवजी चिक्की
पालिका शाळांतील पुरवण्यात येणार्‍या सुगंधित दुधामुळे अनेकवेळा दूधबाधेचे प्रकार घडल्याने सुगंधित दुधाऐवजी इतर पौष्टिक खाद्य देण्याबाबत विचारविनिमय सुरू झाले. यासंदर्भात पालिकेच्या वैद्यकीय संचालक सुहासिनी नगादा यांच्या कमिटीने सुचवल्याप्रमाणे यावर्षीपासून दुधाऐवजी चिक्की व इतर पौष्टिक पदार्थ देण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad