मुंबई- अण्णाभाऊ साठे महामंडळातील अधिकारी, कर्मचारी कर्जदारांकडे असलेली ११३ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी काहीच करीत नाहीत. या वसुलीसाठी त्यांचे पगार रोखण्याचे अस्त्र उपसले परंतु तरीही परिस्थिती पालटली नसल्याची कबुली महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी दिली.
पगार बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण राज्यात १३ टक्के कर्जाची वसुली झाली. कर्जाची वसुली करण्यासाठी राज्यात केवळ १६० कर्मचारी या महामंडळात काम करत असून कामाचा बोजा भरपूर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कर्मचार्यांवर महिन्याला २० लाख रुपये खर्च येतो.
यावेळी कदम यांनी महामंडळ दलालांच्या विळख्यात असल्याचेही मान्य केले. कर्जासाठीचे अर्ज दोन हजार रुपयांत विकले जातात. तसेच मिळणार्या रकमेच्या ५० टक्के रक्कम दलालांना द्यावी लागते अशी माहिती कदम यांनी दिली. तसेच अनेकदा मृत व्यक्तींना ही कर्जे मंजूर करण्यात आल्यामुळे कर्ज वसुलीत अडथळा येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
संभाजीनगर कार्यालयात दलालांचा सुळसुळाट आणि गुंडांचा अड्डा झाल्याने येथील कार्यालये बंद करण्यात आल्याचे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment