पश्चिम उपनगरातील बहुतांश भागातून मिठी नदी वाहते. मुसळधार पावसात पूरपरिस्थिती उद्भवल्यास नदीच्या तटावर राहणार्या झोपडीधारकांना त्याचा फटका बसू शकतो. तसेच उपनगरातील प्रमुख पर्जन्य जलवाहिनी म्हणून मिठी नदी ओळखली जाते. नदीच्या सौंदर्यीकरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र अद्यापि पालिकेने यासाठी सल्लागाराची निवड केली नाही. या परिस्थितीत निविदा तातडीने मंजूर करून सौंदर्यीकरणाचे काम सुरू करावे, याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा, नदीचे खोलीकरण, विस्तारीकरण आणि संरक्षक भिंतीच्या अपूर्ण कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश या वेळी खान यांनी संबंधित अधिकार्यांना दिले. प्रत्येक वॉर्डात कंट्रोल रूम उभारावी पावसाळ्यातील संभाव्य आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येक वॉर्डात कंट्रोल रूम उभारण्यात यावी, असे निर्देश या वेळी खान यांनी दिले. तसेच पालिका, रेल्वे, एमएमआरडीए, विमानतळ प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आपल्या अखत्यारीतील कामांचे समन्वयाने नियोजन करावे, असेही खान या वेळी म्हणाले.?मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील सर्व नाले आणि गटारांची सफाई कोणत्याही परिस्थितीत ५ जूनपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नसीम खान यांनी मुंबई मनपाच्या अधिकार्यांना दिले आहेत. पावसाळा ऐन तोंडावर आल्याच्या परिस्थितीत मंत्रालयात बोलविण्यात आलेल्या आढावा बैठकीत खान यांनी नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी खान यांनी मिठी नदीच्या सफाईचे काम ११ टक्केच झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मंत्रालयातील नालेसफाईच्या आढावा बैठकीत मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता, संचालक (यांत्रिकी व सेवा प्रकल्प) एल. एस. व्हटकर, पश्चिम व पूर्व उपनगरचे उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिनी) अनुक्रमे एस. पी. मिस्त्री व आर. आर. चिंचोळे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यातील संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नालेसफाईच्या कामास गती द्यावी. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील लोकसंख्या आणि नाल्यांची लांबी पाहता नालेसफाईच्या कामात कोणतीही हयगय होऊ नये यासाठी पालिकेच्या अधिकार्यांनी लक्ष घालावे, अशी सूचना या वेळी खान यांनी केली. अरुंद नाल्यांमध्ये मशिनच्या सहाय्याने नालेसफाई करता येत नसल्यास मनुष्यबळाचा वापर करावा तसेच पाणी तुंबणार्या सखल भागात पंप बसविण्यात यावे, अशी सूचना या वेळी खान यांनी केली. |
Post Top Ad
23 May 2013
Home
Unlabelled
उपनगरातील नालेसफाई ५ जूनपर्यंत पूर्ण करा - नसीम खान
उपनगरातील नालेसफाई ५ जूनपर्यंत पूर्ण करा - नसीम खान
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment