निराधार मुलींच्या लग्नासाठीच्या निधीत वाढ - नाईक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 May 2013

निराधार मुलींच्या लग्नासाठीच्या निधीत वाढ - नाईक

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजना विभागाच्या माध्यमातून नवी मुंबई कार्यक्षेत्रातील विधवा, परितक्त्या, घटस्फोटित तसेच निराधार महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीत आणखीन १५ हजारांची वाढ करून ३५ हजारांवरून ५0 हजार रुपये देण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकत्याच झालेल्या जनता दरबारात प्रशासनाला दिले. पालिकेच्या योजना विभागमार्फत विधवा, निराधार महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी ३५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. मात्र पालकमंत्री गणेश नाईक यांनी यासाठी ट्रस्ट तयार करण्याच्या सूचना जनता दरबारात केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad