आसाममधून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2013

आसाममधून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेवर

गुवाहाटी : पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आसाममधून राज्यसभा निवडणूक जिंकली आहे. या जागेवरून डॉ. मनमोहन सिंग सलग पाच वेळेस विजयी झाले आहेत. आसाममधून राज्यसभेच्या दुसर्‍या जागेवरही काँग्रेस उमेदवार सांतिउसे कुजूर यांचा विजय झाला आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष एआयडीयूडीएफच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

आसाममधून राज्यसभेच्या दोन जागांसाठी गुरुवारी सकाळी नऊ वाजता मतदान सुरू झाले. संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर पाच वाजता लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. १२६ जागांच्या आसाम विधानसभेत काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आमदारांचे संख्याबळ पाहता काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय निश्‍चित होता. विधानसभेत काँग्रेसचे ७९ तर मित्रपक्ष बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)चे १२ आमदार आहेत. प्रमुख विरोधी पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट(एआयडीयूडीएफ) चे केवळ १८ आमदार असल्याने त्यांचे उमेदवार अमीनुल इस्लाम यांचा पराभव निश्‍चित होता. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार ४९ सदस्यांनी पंतप्रधानांना तर ४५ जणांनी कुजूर यांना मतदान केले. भाजपा (५) आणि आसाम गण परिषदेच्या (९) सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तत्पूर्वी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सकाळी ९ वाजता सर्वात प्रथम मतदान केले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पहिल्यांदा १९९१ साली आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९९५, २00१, २00७ आणि आता या वर्षीही ते येथून विजयी झाले आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांनी १९९९ साली जनतेमधून निवडणूक लढविण्याचा प्रय▪केला आणि दक्षिण दिल्ली मतदारसंघातून ते उभे राहिले; परंतु येथे त्यांना पराभव पत्करावा लागल्यामुळे ते संसदेत मागच्या दारातून म्हणजे राज्यसभेतूनच जात आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad