मुंबई : एजंटांच्या दहशतीमुळे कर्जबाजारी झालेल्या संदीप पाटील या तरुणाच्या आत्महत्येस जबाबदार असणार्यांना अटक करावी; अन्यथा दहिसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सुर्वे आणि तालुका अध्यक्ष भास्कर खरसंगे यांनी दिला आहे. दहिसर (पू.), कोकणीपाडा येथील सिद्धेश्वर सोसायटीत राहणार्या संदीप पाटील काही कामासाठी कर्ज घेतले होते. पाटीलने घेतलेले हे कर्ज वसूल करण्यासाठी अरुण भाटिया व इतर तीन एजंटस्नी त्याच्याकडे तगादा लावला होता. संदीपने आपल्यास कर्ज फेडण्यासाठी काही दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती एजंट्सना केली होती. मात्र एजंट्सनी त्यालाच मारहाण करत मुदतवाढ देण्यास नकार दिला होता. त्यामुळे नैराश्येच्या अवस्थेत पोहचलेल्या संदीपने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर या खळबळजनक घटनेचा उलगडा झाला. दहिसर पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट मिळाली असून, त्यात भाटियासह चार एजंट्सची नावे नमूद करण्यात आली आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अरुण भाटिया व इतर तिघांचा शोध सुरू केला आहे. उत्तर मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दहिसर पोलीस ठाण्याला घेराव घालून दोषींना अटक करण्याचे निवेदन सादर केले आहे. सोमवारपर्यंत सर्व आरोपींना अटक न केल्यास दुसर्या दिवशी दहिसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सुर्वे यांनी दिला आहे. |
Post Top Ad
13 May 2013
Home
Unlabelled
..तर दहिसर पोलीस ठाण्यावर मोर्चा
..तर दहिसर पोलीस ठाण्यावर मोर्चा
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment