3 जूनला नाव उघड करणार
मुंबई - क्रिकेट सट्टेबाजीचा गॉडफादर राज्यातील एक वजनदार नेता आहे. केंद्र सरकारने त्याबाबत दोन जूनपर्यंत चौकशी करावी. अन्यथा दुस-या दिवशी या नेत्याच्या नावासह पुरावे प्रसिद्धी माध्यमांकडे सादर करीन, असा गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
आंबेडकर म्हणाले, बीसीसीआय देशाच्या सुरक्षिततेबातची महत्त्वाची माहिती इतर राष्ट्रांना पुरवत असून त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे आहेत. ही गोपनीय माहिती उघड करणे शक्य नाही, त्यामुळे केंद्र सरकारने त्याबाबत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला ‘सलवा जुडूम’ची प्रतिक्रिया आहे. हल्ला निषेधार्ह आहेच, पण सलवा जुडूमवरचा अत्याचार तेवढाच निषेधार्ह होता, असेही ते म्हणाले.
मराठा संघटना नेभळट
दलित तरुण नक्षलवादाकडे वळत नाही. मराठा घराणेशाहीचे राजकारण शाबूत राखण्यासाठी सरकारने अशी हूल उठवली असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा संघटना नेभळट आहेत. राखीव जागांबाबत त्या केवळ इशारे देतात. प्रस्थापित मराठा घराण्यांची सत्ता मोडून न काढता त्यांना राखीव जागा हव्या आहेत, म्हणूनच त्यांची साथ सोडली. महाराष्ट्र लोकशाही आघाडी लोकसभा, विधानसभेच्या राज्यातील सर्व जागा लढवणार असून लोकसभेला अकोल्यातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment