एलबीटी रद्द न केल्यास उग्र आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2013

एलबीटी रद्द न केल्यास उग्र आंदोलन


मुंबई : एलबीटी रद्द करण्यासाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या होलसेल व्यापार्‍यांच्या उपोषणात शुक्रवारी आणखी व्यापारी सामील झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर शनिवारी होणार्‍या बैठकीत एलबीटी रद्द करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही तर व्यापारी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करतील. तसेच ८ मेपासून राज्यातील होलसेल, रिटेल व्यापारी आपली दुकाने, व्यापार बंद ठेवतील. वेळप्रसंगी रेल्वेरोको आंदोलनही करतील, असा इशारा व्यापारी संघटनेतर्फे स्टील चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रदीप शाह यांनी दिला आहे.

एलबीटी रद्द झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्रा व्यापार्‍यांच्या फाम संघटनेने घेतला आहे. त्यानुसार गुरुवारपासून व्यापार्‍यांनी आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले आहे. होलसेल व्यापार्‍यांच्या बंदमध्ये आता हळूहळू रिटेल दुकानदार सहभागी होऊ लागले आहेत. शुक्रवारी घाटकोपर, मालाड, कांदिवली, बोरिवली, अंधेरी, सांताक्रुझ, दादर आदी ठिकाणच्या रिटेल व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून होलसेल व्यापार्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. ८ मेपासून रिटेल व्यापारी राज्यभरातून बंद पुकारतील. शनिवारपासून मुंबईतील मेडिकल स्टोअर्स व्यापार्‍यांच्या बंदमध्ये सहभागी होतील, असे शाह यांनी या वेळी सांगितले. मुंबईतील ६0 ते ७0 टक्के रिटेल दुकाने शुक्रवारी बंद होती. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad