मुंबई- म्हाडाच्या संक्रमण शिबिरांतील (ट्रान्झिट) गाळे घेऊनही त्याचे कोट्यवधी रुपयांचे भाडे थकविणाऱ्या 26 बिल्डरांपैकी आणखी सहा बिल्डरांची बॅंक खाती गोठवण्याची कारवाई करण्याची प्रक्रिया म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने सुरू केली आहे. हे सहा बिल्डर कोण, याचा तपशील देण्यास नकार देतानाच यांच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
झोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) प्रकल्प राबविताना झोपडपट्टीवासीयांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी या बिल्डरांनी 1993-94 पासून म्हाडाच्या संक्रमण शिबरांतील गाळे घेतले होते; मात्र त्याचे भाडे वर्षानुवर्षे थकविले. त्या काळात म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केल्याने म्हाडाचे तब्बल 24 कोटी रुपये थकले होते; तर एक हजार 128 गाळेही या बिल्डरांकडे अडकून पडले होते. हे गाळे प्रामुख्याने शीव-प्रतीक्षा नगर, धारावी, कुलाबा, कुर्ला येथील होते.
काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती मंडळावर मोहन ठोंबरे हे मुख्य अधिकारी म्हणून आल्यानंतर याप्रकरणी कारवाई सुरू झाली.
या सर्व बिल्डरांना नोटिसा बजावल्यानंतर त्यांच्यापैकी चार जणांनी काही दिवसांतच थकित रक्कम भरण्यासह आपल्या ताब्यातील गाळेही म्हाडाला परत केले. आणखी 11 बिल्डरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला; मात्र 11 बिल्डरांनी याविषयीच्या कारवाईला अजिबात प्रतिसाद दिला नाही. म्हणून अशांची बॅंक खाती गोठवण्याची कारवाई मंडळाने सुरू केली. आतापर्यंत पंक्ती डेव्हलपर्स, जानकी डेव्हलपर्स आणि के. के. बिल्डर या तीन बिल्डरांची बॅंक खाती गोठवण्याची कारवाई मंडळाने केली असून लवकरच आणखी सहा बिल्डरांवरही अशी कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

No comments:
Post a Comment