फेसबुक वर बाबासाहेबानंतर भगवान बुद्ध आणि भिक्कुंचा अवमान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2013

फेसबुक वर बाबासाहेबानंतर भगवान बुद्ध आणि भिक्कुंचा अवमान


बाबासाहेबांच्या अवमाननेचा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद 
अग्रवालकडून आता भगवान बुद्ध आणि भिक्कुंचा अवमान
मुंबई / अजेयकुमार जाधव ( http://jpnnews.webs.com )
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत फेसबुक या सोशल नेट्वर्किंग साईट वरून गरळ ओकल्याने 
 
संदीप अग्रवाल नामक व्यक्तीच्या विरोधात 
 
मुंबईच्या चेंबूर पोलिस ठाण्यामध्ये तसेच सायबर क्राइम विभागात गुन्हा नोंद करण्यात आला असला तरीही या अग्रवाल नामक व्यक्तीने गुन्हा नोंद झाल्यावरही 
 
फेसबुकवरून भगवान बुद्ध व बौद्ध भिक्कुंचा अवमान केला आहे.

रिपब्लिकन सेनेचे चेंबूर येथील नवनीत अहिरे यांना फेसबुक वरील http://m.facebook.com/Sandeepkumaragarwal?v=timeline&refid= या लिंक वरून 
 
संदीप अग्रवाल नामक व्यक्तींने 
बाबासाहेबांबद्दल भडुवा आतँकबादी, सवर्णो का खून चुसने वाला व्याम्पायर, अंबेडकर को आरक्षण के आधार पर संबिधान निर्माण मेँ टाइपिँग कि नौकरी लगी थी, टाइपिँग मास्टर अंबेडकर आज होता तो किसी कोने मेँ 10 रुपये पेज के हिसाब से टाइपिँग कर रहा होता, मनुस्मृत्ति कि नकल कर के अंग्रेजोँ ने संबिधान बनाया उसी संबिधान को टाइपिँग करके कोइ मंदबुद्धि संबिधान निर्माता बन गया अशी कित्तेक हिंदी भाषेतून आक्षेपार्य विधाने केली असल्याची माहिती मिळाली होती.

सदर माहितीच्या आधारावर नवनीत अहिरे, विनोद शिंदे, बाळासाहेब आठवले, इत्यादी आंबेडकरी जनतेने चेंबूर पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केली असता वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमरावराठोड यांनी सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधून सदर लिंक बंद करण्यास सांगितले आहे. सायबर क्राइम विभागानेही येत्या २४ तासात कारवाही करून या लिंक वरील आक्षेपार्य फोटो व कमेंट दिसणार नाही याची हमी दिली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्राची विटंबना करून हेतू पुरस्पर आक्षेपार्य मजकूर फेसबुकवर प्रसिद्ध करून आंबेडकरी जनतेच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे चेंबूर पोलिसांनी 
 
संदीप अग्रवाल नामक व्यक्तीं विरुद्ध 
बुधवारी (२९ मे रोजी) रात्री कलम २९५(अ),१५३(अ) तसेच आयटीच्या ६६ (अ) कलमाखाली गुन्हा (एफआयआर क्रमांक १४३/१३) नोंद करून घेतला आहे.
 

चेंबूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला असतानाही सायबर क्राइम विभागाने २४ तासात कारवाही करू असे चेंबूर पोलिस ठाण्याला कळवले असतानाही या 
 
संदीप अग्रवाल नामक व्यक्तीं विरुद्ध कारवाही झाली नसल्याने अग्रवाल याने भगवान बुद्ध व बौध्द भिक्कुंचा अवमानही केला आहे. भगवान बुद्ध यांचे अश्लील छायाचित्र फेसबुक वर टाकून मायस, मांस, मुदरा, मैथुन, मदिरा चे बौध्द भिक्कू पुजारी आहेत, वाज्र्यायान दर्शनानुसार पुरुष आणि महिलेचे मिलनच मोक्ष, निर्वाण प्राप्तीचा रस्ता आहे. हे अहिंसावादी इतके आंधळे असतात कि ते खून आणि बलात्कार सुद्धा करू शकतात असे लिहिण्यात आले आहे. तसेच बौद्ध भिक्कुना दान देतानाचा फोटो फेसबुक वर टाकून साले भन्ते भिक मागत फिरतात असे लिहिण्यात आले आहे. 

अद्याप एकाही प्रकरणी आरोपीला अटक नाही 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर महापुरुषांबाबत सतत फेसबुक या सोशल नेट्वर्किंग साईट वरून आक्षेपार्य विधाने व विटंबना करणारे फोटो टाकली जात आहेत. पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यावर पोलिसांकडून कारवाही म्हणून फक्त सदर लिंक बंद करण्याचे काम केले जात आहे. परंतु आता पर्यंत विटंबना करणाऱ्या एकाही आरोपीला पोलिसांनी पकडून लोकांसमोर किवा न्यायालयासमोर हजर केले नसल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला असून पोलिसानी आरोपीला समोर आणून कारवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंबेडकरी 
 
जनतेकडून 
 
तसेच 
 
संघटनाकडून 
 
देण्यात आला आहे. 




फेसबुक वरील http://m.facebook.com/Sandeepkumaragarwal?v=timeline&refid= या लिंक वरून आक्षेपार्य विधाने संदीप अग्रवाल नामक व्यक्तींने केली आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad