टेलीमार्केटर्सवर आता कडक कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2013

टेलीमार्केटर्सवर आता कडक कारवाई

नवी दिल्ली : उत्पादन विक्रीसाठी मोबाइल फोनवरून सतावणार्‍या टेलीमार्केटिंग कंपन्यांची आता खैर नाही. दूरसंचार नियामक ट्राय संस्थेने यापुढे अशा कंपन्यांच्या जोडण्या तत्काळ तोडण्याचा व त्यांना दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रायच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत व्यापारी संवादाबाबत तक्रार आल्यास अशा मार्केटिंग संस्थेची मोबाइल फोनजोडणी त्वरित कापण्यात येणार आहे. तसेच अशा कंपनीचे नाव आणि पत्ता दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्याही कपंनीकडून अशा कंपनीस दूरसंचार सेवा पुरवण्यात येणार नाही. ट्राय संस्थेचा हा नियम गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यापासून ३0 दिवसांच्या आत लागू करण्यात येणार आहे. ट्रायने १ डिसेंबर २0१0 रोजी 'द टेलिकॉम कर्मशिअल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन २0१0' हा अधिनियम जारी केला होता. हा कायदा २७ सप्टेंबर २0११ पासून अमलातही आला होता. त्यानंतर ट्रायने अनेक नियामक नियम वेळोवेळी जाहीर करून जनतेला त्रासदायक ठरणार्‍या मोबाइल फोनपासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. तरीदेखील ग्राहकांना सतावणार्‍या अनाहूत मोबाइल फोनच्या प्रमाणात घट झालेली नाही. ट्रायकडे अशा अनेक तक्रारी सातत्याने येतच आहेत. यामुळे ट्रायने आता अत्यंत कडक भूमिका घेत नवे नियम जाहीर केले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad