मुंबई : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने रविवार, १२ मे २0१३ पासून कॉम्प्युटर हार्डवेअर अँसेंब्लिंग कोर्सचे (लॅपटॉप अँसेंब्लिंग) प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कॉम्प्युटर हार्डवेअर अँसेंब्लिंग कोर्स (लॅपटॉप अँसेंब्लिंग) या प्रात्यक्षिकांसह अँसेंब्लिंग ऑफ कॉम्प्युटर, लॅपटॉप अँसेंब्लिंग व ओएस इन्स्टॉलेशनचे विविध प्रकार, बेसिक नेटवर्किंग, डाटा रिकव्हरी, काँट्रन फिलिंग, सिक्युरिटी कॅमेरा इन्स्टॉलेशन आणि ट्रबल शूटिंग इत्यादी भागांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला २0११चा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी शनिवार-रविवारसुद्धा आहे. एकूण जागा २0 असून वयोर्मयादा १६ वर्षांवरील आहे. तरी या प्रशिक्षणात ज्या उमेदवारांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी सी.बी. कोरा ग्रामोद्योग संस्थान, शिंपोली गाव, गावदेवी मैदानाजवळ, म्युनिसिपल शाळेसमोर, बोरिवली (पश्चिम), मुंबई- ९२. फोन - ९६१९६९६0७९, ९३२४७७२0२९, ९८२२३६५७१७, ९८९0६८३२७६ येथे संपर्क साधावा. बाहेरगावच्या इच्छुक उमेदवारांना राहण्याची मोफत वसतिगृहाची सुविधा देण्यात आली आहे.
Post Top Ad
08 May 2013
Home
Unlabelled
कॉम्प्युटर हार्डवेअर अँसेंब्लिंग कोर्सचे आयोजन
कॉम्प्युटर हार्डवेअर अँसेंब्लिंग कोर्सचे आयोजन
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment