दूध दरवाढीला मंजुरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 May 2013

दूध दरवाढीला मंजुरी

मुंबई : राज्यात गाईच्या दुधाचा दर प्रत्येक लिटरमागे दोन रुपये, तर म्हशीच्या दुधाचा दर प्रत्येक लिटरमागे चार रुपयांनी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे समजते. लवकरच या दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राज्याचे दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी राज्यातील दूध उत्पादक संघांच्या प्रतिनिधींशी अलीकडे याबाबत चर्चा केली होती. गाईच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर तीन रुपये, तर म्हशीच्या दुधाच्या भावात प्रतिलिटर सात रुपयांनी दरवाढ करावी, अशी दूध उत्पादकांची मागणी होती. या मागणीचा सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर शासनाने ही दरवाढ केल्याचे समजते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी आकस्मिकता निधीत वाढ करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पातील बाधाग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेजमध्ये वाढ करणे, पुणे विद्यापीठाच्या पाली भाषा विभागातील रिक्त पदे भरणे आदी विषयांवरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे कळते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad