चौदा वर्षांखालील मूल हरवले तर अपहरणाचा गुन्हा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 May 2013

चौदा वर्षांखालील मूल हरवले तर अपहरणाचा गुन्हा


मुंबई : हरवलेल्या १४ वर्षांखालील मुलांची तक्रार आता पोलीस ठाण्यातील नोंदवहीत न घेता या प्रकरणांमध्ये थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक सर्व पोलीस ठाण्यांना तातडीने पाठविण्याचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिले आहेत. 

नुकत्याच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करताना यापुढे चौदा वर्षांखालील मुलगा हरवल्यास या प्रकरणांमध्ये थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे आता हरविलेल्या मुलांच्या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने होणार आहे. अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच्या तपासाबाबत पुढील कार्यवाही तत्काळ करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत. सध्या चौदा वर्षांखालील हरवलेल्या मुलांबद्दल त्यांच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर त्याची हरविलेल्या व्यक्तीच्या वहीत नोंद घेतली जाते. नंतर गरज पडल्यास किंवा परिस्थिती पाहून या नोंदीवरून गुन्हा दाखल केला जातो. केवळ मिसिंग रजिस्टरमध्ये नोंद घेतल्याने या अपहृत मुलांच्या तपासात गांभीर्य नसते, असाही काही लोकांचा समज होता. मात्र आता अशा प्रकरणांमध्ये थेट गुन्हाच दाखल होणार असल्याने त्याचा संपूर्ण तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad