मुंबई- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आघाडी आणि महायुतीमध्ये आगामी निवडणुकांमध्ये युद्ध पेटणार आहे. त्यात आणखी एका आघाडीची भर पडली आहे. भारिप बहुजन महसंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडीची घोषणा केली आहे. आघाडीत एकूण 23 पक्ष राहणार आहेत. डावे आणि मुस्लिम संघटनांना या आघाडीत समाविष्ट करण्यात आले आहे. आगामी निवडणुका ही आघाडी लढविणार आहे. आघाडीच्या नेत्यांची 14 मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे.
यासंदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले, राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. कोणत्याच राजकीय पक्षाला विजयाची खात्री नाही. जनताच पर्याय शोधत आहे. त्यामुळे आम्ही जनतेला पर्याय देत आहोत. ओबीसी आरक्षणाला आमचा विरोध नाही. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी तो निर्णय घ्यावा. परंतु, वंचितांवर अन्याय व्हायला नको, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

No comments:
Post a Comment