पत्रकार संरक्षण कायद्यासाठी रॅली - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2013

demo-image

पत्रकार संरक्षण कायद्यासाठी रॅली


अलिबाग : पत्रकार संरक्षण कायदा व्हावा, या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे ८ मे रोजी पनवेल ते मुख्यमंत्री निवासस्थानापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये सर्व पत्रकार संघटनांनी पाठिंबा देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे रायगड जिल्हा निमंत्रक संतोष पवार यांनी केले. या वेळी रायगड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय प्रतिनिधी मिलिंद अष्टिवकर, रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संतोष पेरणे आदी उपस्थित होते. पत्रकार हल्ला विरोधी कायदा व्हावा, ही मागणी अनेक वर्षांपासून पत्रकार शासनाकडे करत आहेत. मात्र आश्‍वासनांपलीकडे शासनाने काहीही केलेले नाही. त्यामुळे पत्रकारांनी आता ८ मे रोजी रॅली काढण्याचे ठरविले आहे. पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथून रॅलीला सुरु वात होईल. ही रॅली नवी मुंबई चेंबूरमार्गे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धडकेल. येथेच रॅलीचा समारोप होईल. या रॅलीत सहभागी होणारे पत्रकार शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती तसेच काळे टी शर्ट, काळे झेंडे घेऊन सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages