मुंबई: महानिर्मितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील धुळ्यातील साक्री येथे उभारणी करण्यात आलेल्या १२५ मेगावॅटच्या सौर प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यात आली असून मार्च व एप्रिल महिन्यांच्या कालावधीत १३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मार्च अखेरपासून नियमितपणे सुरू असलेल्या या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी ३२५ हेक्टर जमिनीवर करण्यात आली आहे. या प्रकल्पातून मार्च महिन्यात १२४५२ युनिट्स, तर एप्रिल महिन्यात ८६४८६७९ युनिट्स इतकी वीजनिर्मिती साध्य करण्यात आली आहे. तसेच १ ते १५ मे या कालावधी ८५८२३९७ युनिट्स इतकी वीजनिर्मिती साध्य करण्यात आली आहे. वीज उत्पादनाच्या माध्यमातून या प्रकल्पातून महानिर्मितीला मार्च-एप्रिल २0१३ या कालावधीसाठी १३.३२ कोटी इतका महसूल प्राप्त होणार आहे. १२५ मेगावॅट पैकी ७५ मेगावॅट क्रिस्टलाइन फोटो व्होल्टाईक तंत्रज्ञानावर आधारित असून मे. लँको यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे, तर उर्वरित ५0 मेगावॅटही थिन फोटो व्होल्टाईक तंत्रज्ञानावर आधारित असून मेघा इंजिनीयरिंग यांच्यामार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी एकूण ८ लाख २३३१९ सौर मॉडेल्स उभारण्यात येत आहेत. एकूण १६४२ कोटी रुपयांचा खर्च प्रकल्पासाठी आला असून इंडो र्जमन सहकार्य कराराअंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सौर प्रकल्पांबरोबरच अत्याधुनिक वीज केंद्रही उभारण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment