भैया देशमुखांची आठवलेंकडून विचारपूस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2013

भैया देशमुखांची आठवलेंकडून विचारपूस


सोलापूर जिल्ह्याला पाणी मिळावे यासाठी गेले ९९ दिवसाहून अधिक दिवस मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करणाऱ्या भैया देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सोमवारी रामदास आठवले यांनी देशमुख यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. 

१२ मेच्या मध्यरात्री दीड वाजता सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर (भैया) देशमुख यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केल्यानंतर आठवले यांची भेट महत्त्वाची ठरली. त्या वेळी आठवले यांच्याशी बोलताना भैया देशमुख म्हणाले की, न्याय्य मागण्यासाठी आझाद मैदानात येणार्‍या आंदोलनकर्त्यांवर जर हल्ले होत असतील तर आंदोलन करायचे की नाही? असा प्रश्न आता आंदोलनकर्त्यांना पडला आहे. आंदोलनकर्त्यांची शासनाला भीती का वाटत आहे? वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करणार्‍या आंदोलनकर्त्यांना जर धमकावले जात असेल तर अगोदर आंदोलनाची परवानगी देऊ नये. वादग्रस्त लोकप्रतिनीधींचेच गुंड अशा प्रकारचे कृत्य करू शकतात, असा आरोप देशमुख यांनी आठवले यांच्याशी बोलताना केला. 

आझाद मैदानातील आंदोलनाला एक प्रकारचे गालबोट लागावे अशी १२ मेची घटना आहे. पत्रकार, डॉक्टर, शेतकरी, शिक्षक, अभियंते, समाजसेवक, वारकरी आदी प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक न्याय मागण्यासाठी आझाद मैदानात येत असतात, मात्र गेल्या ९९ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करणार्‍या प्रभाकर भैया देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा शासनाने गांभीर्याने विचार केला नाहीतर भविष्यात आझाद मैदानावरील चित्र भयानक असेल. न्याय मागण्यासाठी येणार्‍या जनतेला जर अशा प्रकारे अन्याय होत असेल तर आंदोलनकर्त्यांनी न्याय कसा मागावा? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad