मुंबई : मुंबई महानगरपालिका शाळांमधून या वर्षीपासून सेमी इंग्रजी सुरू करण्यात येणार असून, ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी गणित आणि सामाजिक शास्त्र हे दोन विषय सेमी इंग्रजीतून शिकवण्यात येणार आहे. सेमी इंग्रजी शिकवण्यास पालिकेतील शिक्षकांना ब्रिटिश काऊन्सिल या संस्थेकडून विशेष प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांनी सांगितले. |
मुंबई महानगरपालिकेतील प्राथमिक शाळांमधून शिकणार्या विद्यार्थ्यांना माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक इंग्रजी भाषेची अडचण होत असल्याने त्यांना ही भाषा सहज अवगत व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कोटक यांनी सांगितले. पालिकेतील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी माध्यमातून दोन विषय शिकविण्यासाठी पालिकेतील २५0 शिक्षकांना ब्रिटिश काऊन्सिलकडून प्रशिक्षण दिले जात असून, आतापर्यंत यातील १८ शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या माध्यमातून पालिकेतील २५00 शिक्षकांना या संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे कोटक यांनी सांगितले. प्रशिक्षण काळ एक महिन्याचा असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजी सुरू केले जाणार आहे. यांसदर्भात स्पेशल सेमिनारचे आयोजन करून प्रसारमाध्यमांसमोर प्रशिक्षित शिक्षकांची प्रगती आणली जाणार असल्याचे मनोज कोटक यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment