मालेगाव स्फोट; चार आरोपींवर आरोपपत्र दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2013

मालेगाव स्फोट; चार आरोपींवर आरोपपत्र दाखल

मुंबई - मालेगाव येथे 2006 मध्ये झालेल्या बाँबस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) चौघांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. लोकेश शर्मा, धनसिंग, मनोहर सिंग आणि राजेंद्र चौधरी यांच्यावर आरोपपत्रात ठपका ठेवण्यात आला असून रामजी कालसांगरा हा आरोपी फरारी दाखवण्यात आला आहे. विशेष मोक्का न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले.

8 सप्टेंबर 2006 रोजी मालेगाव येथे शब-ए-बारातच्या दिवशी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने प्रार्थनेसाठी जमले होते. प्रार्थना संपल्यानंतर दुपारी सव्वाच्या सुमारास स्फोट झाले होते.या स्फोटांत 37 जणांचा मृत्यू, तर 125 जण जखमी झाले होते. या बाँबस्फोट घडवण्यासाठी सायकलींचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने 9 संशयितांना अटक केली, परंतु मोक्का  न्यायालयाने मागील वर्षी जामीन मंजूर केला होता.  दरम्यान आरोपी धनसिंगलाही बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad