दुकाने सुरू करण्याचा राज ठाकरेंचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 May 2013

दुकाने सुरू करण्याचा राज ठाकरेंचा इशारा

मुंबई : एलबीटीविरोधात व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंद आंदोलनावर आधीच चपराक देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा व्यापार्‍यांना फटकारले आहे. दुकाने बंद ठेवून जनतेला वेठीस धरणार्‍या व्यापार्‍यांनी आंदोलनातून त्वरित माघार घ्यावी, अन्यथा मनसे कार्यकर्ते दुकाने आपल्या स्टाईलने सुरू करतील, असा इशारा राज यांनी रविवारी दिला आहे.

एलबीटी रद्द करण्यासाठी राज्यभरातील व्यापार्‍यांनी बंद आंदोलन सुरू करत महाराष्ट्र नवननिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज' निवासस्थानी भेट घेतली होती. त्या वेळी राज यांनी व्यापार्‍यांना खडसावत तुमचा वाद सरकारबरोबर असल्याने जनतेला वेठीस धरू नये, दुकाने आधी सुरू करावीत, त्यानंतर चर्चा करावी, असा सल्ला दिला होता. मात्र व्यापार्‍यांनी काही ठिकाणी बंद आंदोलन सुरूच ठेवल्याने आता मनसेने व्यापार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी एका पत्रकाद्वारे राज ठाकरे यांनी म्हटले की, एलबीटी रद्द व्हावा किंवा त्याच्यात बदल व्हावा, या मागणीसाठी राज्यातील व्यापार्‍यांनी गेल्या काही दिवसांपासून संप करून दुकाने बंद ठेवली आहेत. या मागणीसाठी लोकांना त्यांनी आता यापुढे वेठीला धरू नये, शासनाशी वाटाघाटीद्वारे हा प्रश्न मार्गी लावावा. काही ठिकाणी दुकाने उघडली जात आहेत, पण कित्येक ठिकाणी ती अजूनही बंद आहेत. ती दुकाने त्यांनी त्वरित उघडावीत, नाही तर ती आम्ही उघडू, असा इशारा राज यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad