महिलांच्या विरोधात ६.४६ लाख गुन्हे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 May 2013

महिलांच्या विरोधात ६.४६ लाख गुन्हे

नवी दिल्ली : २00९ ते २0११ या तीन वर्षांत विविध गुन्ह्यांखाली देशभरातील महिलांविरुद्ध ६ लाख ४६ हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, त्यातील ३ लाख २१ हजार प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे, अशी माहिती मंगळवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंह यांनी लोकसभेत दिली. 

एवढेच नाही तर २00९ ते २0११ या तीन वर्षांत महिलांविरोधातील २0 लाख ५८ हजार ६८३ गुन्हे देशभरातील विविध न्यायालयांत निपटार्‍याविना प्रलंबित आहेत. त्यात २00९ मध्ये ६ लाख ३५ हजार ५९0, २0१0 मध्ये ६ लाख ८५ हजार ७0८ आणि २0११ मध्ये ७ लाख ३६ हजार ३८५ प्रलंबित गुन्ह्यांचा समावेश आहे. यासंदर्भात सदस्य निशिकांत दुबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर गृहराज्यमंत्री सिंह यांनी लेखी उत्तर दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad