मुंबई : पाकिस्तान, बांगलादेश आदी देशांना आंतरराष्ट्रीय जादूगार महोत्सवामध्ये स्थान मिळते, मात्र भारताला नाही. कारण सांगितले जाते भारतामधील जादूगारांच्या जादू बरोबर नसतात. या पार्श्वभूमीवर मॅजिक अकादमीच्या वतीने जादूगार भूपेश दवे यांनी मॅजिक फेस्ट २0१३ चे आयोजन भारतात केले असून या फेस्टमध्ये जगभरातून जादूगार सहभागी होणार आहेत. २४, २५, २६ मे रोजी यशवंत नाट्य मंदिरामध्ये होत असलेला हा मॅजिक फेस्ट प्रथमच होत आहे. या शोमध्ये सहभाग घेऊ इच्छिणार्या जादूगारांनी ९८२00३८९७६ किंवा ९८२0४३३२२५ येथे एसएमएस द्वारेसंपर्क साधावा. जादूच्या माध्यमातून जनतेचे मनोरंजन होत असते. विचार करायला लावण्याची सवय लागते. भारतातील जादूगारांनी ज्या जादू निर्माण केल्या आहेत. त्यापैकी काही जादूंचे पेटंट अमेरिकेने घेतले आहे. याबाबत सरकारही गप्प आहे. जादूला कला म्हणून गणले जावे यासाठी सरकारचा सांस्कृतिक विभागही सहकार्य करत नाही, असा आरोप दवे यांनी केला. २४ मे रोजी दुपारी ३ वाजता या महोत्सवाचे उद््घाटन हास्य अभिनेते जॉनी लिव्हर यांच्या हस्ते होणार आहे.
Post Top Ad
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment