मुंबई : ड्रंक ड्रायव्हिंगमुळे घडणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी राज्यमार्ग आणि महामार्गाशेजारील जवळपास ४,५00 बार हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने ११ मार्च रोजी दिलेल्या निर्देशानुसार सरकारने हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांलगत बारची संख्या किती आहे? हे स्पष्ट करणारा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी दिली आहे.
महामार्गांच्या ३७.५ मीटर त्रिज्येच्या क्षेत्रात येणारे बार हटवले जाणार आहेत. नगरपरिषद आणि महापालिकांच्या हद्दीत असणार्या बारवर कोणतेही निर्बंध नसून आपण कायदेशीर बाबींबाबत केंद्र सरकारला कळवले असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे. मुंबई शहराबाहेरील महामार्गांशेजारील बारची संख्या स्पष्ट करणारा अहवाल जिल्हाधिकार्यांकडून राज्य सरकारला दोन आठवड्यांत सादर केला जाण्याची शक्यता आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील एकूण १२ हजार बारपैकी ४,५00 बार अन्यत्र हटवले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. २0११ मध्ये संपूर्ण देशभरात २४,६५५ अपघात ड्रंक-ड्रायव्हिंगमुळे घडल्याची माहिती नुकतीच संसदेत देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महामार्गांशेजारील बार अन्यत्र हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
No comments:
Post a Comment