१0 हजार विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2013

१0 हजार विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण

नवी दिल्ली : देशात सायबर सुरक्षा काळाची गरज असल्याचा मुद्दा लक्षात घेता ईसी परिषद आणि 'आयएएनटी'ने संयुक्तरीत्या सायबर सुरक्षा प्रशिक्षणाची घोषणा केली आहे. या प्रशिक्षणात १0,000 विद्यार्थी सहभागी होत असल्याचा दावा संस्थेतर्फे करण्यात आला आहे. या प्रशिक्षणात केवळ सायबर सुरक्षाच नव्हे, तर हॅकिंगचे धडेदेखील दिले जाणार आहेत.

नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार २0१५ पर्यंत भारताला सायबर सुरक्षेसाठी ४.७ लाख तज्ज्ञांची गरज आहे. माहिती-तंत्रज्ञान इमारती तसेच देशाच्या आयात-निर्यात भागातील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी या तज्ज्ञांची भरती केली जाणे गरजेचे राहणार आहे. २0११ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या 'गार्टनर'च्या माहितीनुसार भारतात माहिती-तंत्रज्ञानात २१.८ कोटी अमेरिकी डॉलरची उलाढाल होणार, असे भाकीत वर्तविण्यात आले होते, तर पुढे जाऊन दरवर्षी २0-३0 टक्के वाढ होणार असल्याने त्याच प्रमाणात माहिती-तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्यांची गरज वाढणार आहे. भारताची माहिती-तंत्रज्ञानात वाढती प्रगती पाहता त्याच मानाने तंत्रज्ञान सुरक्षेचा मुद्दादेखील ऐरणीवर आला आहे. अशात सायबर सुरक्षा आणि सुरक्षित हॅकिंगचे ज्ञान असलेल्या तज्ज्ञांचीही मोठय़ा प्रमाणात गरज भासणार आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स नेटवर्क टेक्नॉलॉजीने (आयएएनटी) इथिकल सर्टिफाईड कौन्सिल म्हणजेच जगप्रसिद्ध ईसी परिषदेसोबत येऊन प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत १0,000 विद्यार्थ्यांना हॅकिंग आणि सायबर सुरक्षेचे धडे दिले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad