जनतेच्या सेवेसाठी नगरसेवकांना मोबाइल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 April 2013

जनतेच्या सेवेसाठी नगरसेवकांना मोबाइल

मोबाइल बिलाची मासिक र्मयादा वाढवावी
मुंबई : मुंबई मनपाच्या नगरसेवकांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आल्यानंतर आता सोमवारी जनतेच्या सेवेसाठी मोबाइलचेही वाटप करण्यात आले आहे. जनतेच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेण्यासाठी मुंबई मनपा प्रशासनाने नगरसेवकांना हे मोबाइल दिले आहेत. नगरसेवकांना यामध्ये दर महिन्याला साडेबाराशे रुपयांपर्यंत मोबाइलचे बिल मंजूर करण्यात आले आहे. नगरसेवकांना जनतेच्या असंख्य कामासाठी पालिका कार्यालयाशी संपर्क साधावा लागत असल्याने साडेबाराशे रुपयांची र्मयादा तुटपुंजी आहे. या कारणास्तव मोबाइलची मासिक र्मयादा किमान तीन हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी केली आहे.

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या सूचनेनुसार पालिकेतील नगरसेवकांना सोमवारी सॅमसंग कंपनीचा एस ५८३0 गॅलेक्सी एस हा मोबाइल देण्यात आला आहे. नगरसेवकांना कायमस्वरूपी प्रकारात हे मोबाइल देण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवकांना या संचांची देखभाल आणि दुरुस्ती करावी लागणार आहे. नगरसेवकांना या मोबाइलबरोबर देयकाचे दरमहा १ हजार २५0 रुपये कमाल र्मयादेपर्यंत अधिदानित करण्यात येणार आहेत, मात्र मोबाइल बिलाच्या मासिक र्मयादेवरून नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या र्मयादेच्या पुढे बिल गेल्यास त्याचा खर्च नगरसेवकांना स्वत:च्या खिशातून करावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad