मुंबई : भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून घालवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधण्याची इच्छा व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला देखील सोबत घेण्याची भाजपाची इच्छा असल्याचे सूतोवाच केले, तर रामदास आठवले यांनी मात्र मनसेला सोबत घ्यायचे असेल तर गंभीर विचार करावा लागेल, असे उत्तर पत्रकारांशी बोलताना दिले.
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. येत्या निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती काय आखायची, याबाबत दोघांमध्ये प्राथमिक चर्चा झाली. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेतली.
देशाचा इतिहास पाहिला असता यापूर्वी अनेकदा विविध विचारसरणी असलेले पक्ष निवडणुकांसाठी एकत्र आले असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला महाराष्ट्रातील केवळ ३0 ते ३३ टक्केच जनतेचा पाठिंबा आहे. राज्यातील ७0 ते ६७ टक्के जनता या सरकारच्या बाजूने नाही. विविध विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या सरकारला सत्तेवरून दूर करायला हवे, असेही ते म्हणाले. मनसेला सोबत घेण्याची भाजपाची इच्छा असल्याचेच हे सूतोवाच असल्याचे मानण्यात येत आहे, मात्र आठवले यांनी वेगळा सूर लावला आहे. मनसे महायुतीत यायला तयार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेतून घालवून सत्ता मिळवायची असेल तर शिवसेना-भाजपा आणि रिपाइं ही महायुतीच पुरेशी आहे, मात्र मनसेला सोबत घ्यायचा प्रस्ताव असेल तर शिवसेना-भाजपा आणि रिपाइं अशी तिघांची चर्चा व्हायला हवी. मनसेला सोबत घेण्याचा विचार असेल तर मात्र आम्हाला गंभीर विचार करावा लागेल, असे आपले व्यक्तिगत मत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment