"संभाजी" चित्रपटाला चित्रपटगृहे न दिल्यास आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 April 2013

"संभाजी" चित्रपटाला चित्रपटगृहे न दिल्यास आंदोलन

मुंबई / http://jpnnews.webs.com
मुंबई - छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावर आधारित "संभाजी 1689' हा चित्रपट 17 मे रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला चित्रपटगृहे मिळाली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे भूषण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

संभाजी राजेंनी आपल्या जिवाची बाजी लावली; मात्र मोगल सत्तेपुढे मान तुकविली नाही. हा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्राइम टाइममध्ये चित्रपटगृहे उपलब्ध करावीत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जाधव यांनी दिला. या वेळी मनसेचे संजय जामदार व चित्रपटाचे निर्माते राकेश दुलगज उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad