दलितांवरील अत्याचार थांबवावे अन्यथा प्यान्थर जागा होईल - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 April 2013

दलितांवरील अत्याचार थांबवावे अन्यथा प्यान्थर जागा होईल - रामदास आठवले



महाराष्ट्रात दिवसेंदिवस दलितांवर मोठ्याप्रमाणात अन्याय अत्याचार वाढलेले आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपींना कोणाचीही  भीती राहिलेली नाही .अनुसुचित जाती -जमाती कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्यामुळे आरोपी न्यायालयातून मोकाट सुटत आहे ,दलितांवरिल वाढते हल्ले रोखण्यासाठी पुन्हा महाराष्ट्रात  प्यान्थर्सच्या  माध्यमातून अत्याचाराला विरोध  करण्याची आवश्यकता असल्याच प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आझाद मैदान येते दलितांच्या विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला तेंव्हा ते बोलत होते . 

यावेळी रिपाइ नेते अविनाश महातेकर ,अर्जुन डांगळे ,काकासाहेब खंबाळकर ,सुरेश बारशिंगे ,गौतम सोनावणे ,जगदीश गायकवाड ,रमेश गायकवाड ,पप्पू कागदे ,सचिन मोहिते , आशा लांडगे उपस्थित होते . आठवले पुढे म्हणाले कि महाराष्ट्र भारनियमन मुक्तः करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते त्याचे काय झालं पवारांनी शब्द न पाळला याची खंत आठवल्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील निंबोडी येते एका जाहिर कार्यक्रमात बेताल वक्तव्ये करून खालच्या पातळीवर उतरत दुष्काळ आणि दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवली हे अशोभनीय असून माफी नव्हे तर त्यांनी तात्काळ उपमुख्यमंत्रीच्या राजीनामा द्यावा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad