मुंबई : केमिकलमध्ये पिकवलेला आंबा खाऊन आजारी पडणार्यांची भीती दूर करण्यासाठी कोकण विकास प्रतिष्ठानने आंबा महोत्सव आयोजित केल्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील आंबा मुंबईकरांना खायला मिळणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र तावडे यांनी पत्रकार संघ येथे मंगळवारी दिली. आंबा अजूनही मोठय़ा प्रमाणात बाजारात आला नाही. कोकणातल्या आंब्याची चव वेगळी असते. १३ एप्रिलपासून विलेपार्ले, दादर, ठाणे, बोरिवली, मुलुंड अशा वेगवेगळय़ा ठिकाणी प्रतिष्ठानने आंबा महोत्सव आयोजित केला आहे. याद्वारे वाजवी दरात शुद्ध आंबा मुंबईकरांना मिळणार आहे. यंदा कोकणातील आंब्याचे अपेक्षित उत्पन्न एक लाख २८ हजार मेट्रिक टन आहे. यातील ३६0 कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली जाईल तर १00 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला जाईल, असे तावडे म्हणाले. |
Post Top Ad
10 April 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment