मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण मार्गावरील विद्युत प्रवाहचे डायरेक्ट करंट ते अल्टरनेटिव्ह करंटचे काम ३0 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलबरोबरीने ठाणे ते लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्याही एसी करंटवर धावणार आहेत. मात्र सीएसटी ते ठाण्यापर्यंत धावणार्या लोकल पूर्वीप्रमाणेच डीसी करंटवर धावणार आहेत. या टप्प्यातील डीसी-एसी परावर्तन नेमके कधी होईल, याची मात्र कल्पना कोणालाही नाही.
पश्चिम रेल्वेवरील विद्युत प्रवाह संपूर्णपणे डीसी-एसी विद्युत प्रवाहात परावर्तित झाला आहे. मात्र मध्य रेल्वे याबाबत आजही मागेच आहे. मरेवर सीएसटी ते कल्याणपर्यंतचा मार्ग हा डीसी आहे. हा मार्ग एसीत परावर्तित करण्याची रेल्वेची योजना आजही कागदावरच आहे. परंतु त्यातील तांत्रिक अडचणींमुळे हे काम होण्यास विलंब होत आहे. असे असले तरी मरेने ठाणे ते क ल्याणपर्यंतचा विद्युत प्रवाह एसी करण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार आवश्यक त्या चाचण्या घेतल्या असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. त्यामुळेच ३0 एप्रिल रोजी या लोकल एसीवर चालतील, असा विश्वासही व्यक्त केला. याच दिवशी ठाणे ते कुर्ला टर्मिनसपर्यंत असणार्या ५-६ व्या मार्गावरील विद्युत प्रवाहही एसी होणार आहे. त्यामुळे एलटीटी टर्मिनसहून सुटणार्या सर्व मेल-एक्स्प्रेसला त्याचा फायदा होणार आहे. तसेच विजेची सुमारे ३३ टक्केबचत होणार आहे. या दोन्ही मार्गांवर एसी करंटवर लोकल धावणार असल्या तरी सीएसटी ते ठाण्यापर्यंत सर्व उपनगरीय लोकल त्यानंतरही डीसी करंटवरच धावणार आहेत. कारण या मार्गावरील विद्युत प्रवाहाचे काम कधी पूर्ण होणार हे गुलदस्त्यात आहे.
No comments:
Post a Comment