http://jpnnews.webs.com
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये ज्या पत्रकारांची घरे आहेत अशा पत्रकारांना महापालिकेने त्याच्या हाऊस टॅक्स मध्ये सवलत देण्याचा आणि पत्रकारांच्या गाड्यांसाठी पार्किंग शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौचे महापौर दिनेश शर्मा यांनी काल ही घोषणा केली आहे,
राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांसाठी काम करणाऱ्या पत्रकारांना ही सवलत देण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या सततच्या आग्रहामुळे मुळ प्रस्तावात दुरुस्ती करून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठीही नवी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे शर्मा यांनी सांगितले. या निर्णयाचे लखनौमधील पत्रकारांनी स्वागत केले आहे.
No comments:
Post a Comment