मुंबई : राज्याच्या जलसंपदा खात्याचा अक्षम्य ढिसाळपणा आणि प्रकल्प पूर्ण करण्यापेक्षा प्रकल्प रखडवून त्याच्या मूळ खर्चाच्या किमतीत वाढ करण्याच्या प्रवृत्तीवर 'कॅग'ने आपल्या अहवालात ताशेरे ओढले आहेत. राज्यातील तब्बल २४२ प्रकल्प सुमारे ४0 वर्षे रखडले आणि ७ हजार २१५ कोटींचा मूळ खर्च वाढून तब्बल ३३ हजार ८३२ कोटींवर गेला. पाटबंधारे विकास महामंडळांच्या ९ प्रकल्पांत तर प्रत्येकी किमान ८00 कोटींपेक्षा जास्त वाढ झाल्याचा ठपका 'कॅग'ने ठेवला आहे. भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांचा (कॅग) राज्याच्या वित्त व्यवस्थेवरील अहवाल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात मांडण्यात आला. पाटबंधारे विभागाचे अनेक धरणप्रकल्प ५ ते ४0 वर्षे इतका दीर्घकाळ रखडल्याचे 'कॅग'चे म्हणणे आहे. राज्यात पाण्याअभावी पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कॅगचा हा अहवाल महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे, गोदावरी मराठवाडा आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या ९ प्रकल्पांत भरमसाट वाढ झाली असून प्रत्येकी किमान दरवाढ ८00 कोटी रुपयांच्यावर आहे.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे एकूण तीन प्रकल्प आहेत. त्यातील २00७ साली सुरू झालेल्या कृष्णा मराठवा पाटबंधारे प्रकल्प २ हजार ३८२ कोटी ५0 लाख रुपयांच्या मूळ खर्चाचा होता. प्रत्यक्षात या प्रकल्पावर ४ हजार ८४५ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च झाला. अंदाजित मूळ खर्चापेक्षा या प्रकल्पाचा खर्च २ हजार ४६२ कोटी ५५ लाख रुपयांनी वाढला. याच महामंडळाच्या निम्न दुधना प्रकल्पाच्या १९७९ सालातील मूळ खर्च २८ कोटी ४१ लाख इतका होता. प्रत्यक्षात त्यावर १ हजार २५ कोटी ७८ लाख रुपये इतका खर्च झाला. या प्रकल्पाच्या खर्चात ९९७ कोटी रुपये ३७ लाख रुपयांची वाढ झाली, तर नांदूर मधमेश्वर प्रकल्पाचा खर्च ४८ कोटी ७0 लाख रुपये होता. तो वाढून ८६६ कोटी ६0लाख रुपयांची वाढ झाली.महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचा कुकडी पाटबंधारे प्रकल्प १९६७ साली सुरू झाला. त्याला प्रारंभिक अर्थसंकल्पीय खर्च ३१ कोटी १८ लाख रुपये इतका होता. मात्र तो रखडल्याने त्याचा खर्च वाढून २ हजार १८४ कोटी १६ लाख रुपये झाला. म्हणजे या प्रकल्पाचा खर्च २ हजार १५२ कोटी रुपयांनी वाढला.निम्न तापी प्रकल्पाचा मूळ अंदाजित खर्च १४२ कोटी ६४ लाख रुपये असताना तो वाढत वाढत १ हजार १२७ कोटी ७४ लाखांवर गेला. तब्बल ९८५ कोटी १0 लाख रुपये अधिकचा खर्च या प्रकल्पावर झाला. शेलगाव बारगे मध्यम प्रकल्प १९८ कोटी ५ लाख खर्चाचा होता. खर्च वाढून १ हजार ६८ कोटी ७ लाख रुपयांवर गेला. या प्रकल्पाची किंमत ८७0 कोटी २ लाख रुपयांनी वाढली. बोधवड परिसर सिंचन योजना प्रकल्प ६८९ कोटी १४ लाखांचा असताना या प्रकल्पाचा खर्च १ हजार ५0८ कोटी २३ लाखांचा झाला. या प्रकल्पाच्या खर्चातही ८१९ कोटी रुपयांनी वाढ झाली.१९९२ साली सुरू झालेल्या कोयना ईएसपी टप्पा चार प्रकल्पाचा खर्च ४९ कोटी २४ लाख रुपये होता. मात्र तो वाढून १ हजार १४0 कोटी ५१ लाख इतका झाला. विदर्भ महामंडळाचे ९८,तापी पाटबंधारे २७ प्रकल्प, गोदावरी ३ प्रकल्प सुरू होऊन ३७ वर्षे झाली तरी त्यांची सुधारित किंमत कळविण्यात आलेली नाही. त्याबद्दल 'कॅग'ने नापसंती दर्शविली आहे. |
Post Top Ad
19 April 2013
Home
Unlabelled
जलसंपदा प्रकल्प रखडल्याने मूळ खर्चात वाढ
जलसंपदा प्रकल्प रखडल्याने मूळ खर्चात वाढ
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment