नवी दिल्ली : जाट समुदायाच्या आरक्षणाच्या मागणीवरून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी १४२ जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या घटनेत अटक करण्यात आलेल्या जमावाविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुरुवारी दिल्ली पोलिसांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी बुधवारी रात्री १४२ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व अटक केलेल्या लोकांविरोधात भारतीय दंड विधान १४७, १४९ आणि १८६ सह दंगल, बेकायदा घरात घुसणे, शासकीय कामात अडथळा आणणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जाट आरक्षणाच्या मागणीवरून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बंगल्यातील सुरक्षा घेराव तोडून शेकडोंच्या संख्येने लोक घरात घुसले, तसेच तोडफोडही केली. सुरक्षेत कसूर दाखवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुधवारी घटनास्थळी तैनात १३ पोलीस कर्मचार्यांना निलंबित केले.
Post Top Ad
12 April 2013
Home
Unlabelled
सुशीलकुमारांच्या घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी १४२ जणांना अटक
सुशीलकुमारांच्या घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी १४२ जणांना अटक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment