मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंब्रा येथे घडलेल्या इमारतींच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या इमारतींचेही स्टॅक्चरल ऑडिट करण्यात येणार असल्याचा निर्णय म्हाडा विभागप्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या आगामी सोडतीत पत्रकारांच वर्गातील निकषांसाठी आता माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडील प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारती तसेच म्हाडा वसाहतींतील इमारती अत्यंत जुन्या असून त्याचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. म्हाडाच्या धोकादायक इमारतींची यादी पावसाळ्यापूर्वी जाहीर करण्यात येते. त्यानुसार इमारतींचा पुनर्विकास, रहिवाशांना संक्रमित करण्याची प्रक्रियाही म्हाडाच्या माध्यमातून राबवण्यात येते. त्यामुळे म्हाडा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज व्यक्त करण्यात आल्यानेच याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर १२ वर्षे काम करणार्या म्हाडा कर्मचार्यांनाच आता कर्मचारी संवर्गातून अर्ज करता येणार आहे. गेल्या वर्षी अनेक नवनियुक्त कर्मचार्यांना म्हाडा घरे मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पत्रकार संवर्गातील अर्जदारांना माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून पत्रकारितेतील अनुभवाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती तसेच विविध राखीव संवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment