पालिकेच्या ९ शाळांना टाळे लावण्याचा प्रस्ताव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 April 2013

पालिकेच्या ९ शाळांना टाळे लावण्याचा प्रस्ताव


मुंबई - विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्हर्च्युअल क्‍लास, सुगंधी दूध आणि 27 शैक्षणिक वस्तू मोफत देऊनही मुंबई महानगरपालिकेच्या अनेक शाळांबंद होत आहेत. सन १२ -१३ या शैक्षणिक वर्षात एकही विद्यार्थी नसलेल्या नऊ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बंद पडणाऱ्या शाळांत मराठी शाळांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या सहा वर्षांत तब्बल 56 हजार विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शाळा सोडल्या आहेत.

पालिकेच्या शाळांना लागलेली गळती रोखण्यासाठी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर सकस आहार मिळण्यासाठी पालिका दर वर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करते. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाते; मात्र पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती कमी होऊ शकलेली नाही. भाषिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षी कमी होत आहे. यंदा नऊ शाळा बंद होणार आहेत, तर दोन शाळांत हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढे विद्यार्थी असल्याने त्यांना दुसऱ्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.

बंद होणाऱ्या ९ शाळा गणेशनगर पालिका मराठी शाळा (घाटकोपर), वीर संभाजीनगर मराठी शाळा (मुलुंड), सुभाषनगर पालिका मराठी शाळा (भांडुप), तिरंदाज व्हिलेज गुजराती शाळा (भांडुप), साईनाथनगर कन्नड शाळा (घाटकोपर), कांजूर व्हिलेज गुजराती शाळा (कांजूरमार्ग), न्यू माहीम गुजराती शाळा (माहीम), विक्रोळी पार्कसाईट तेलगू शाळा (विक्रोळी), माटुंगा लेबर कॅम्प पालिका शाळा (माटुंगा).

स्थलांतरित २ शाळा धनजी देवजी पालिका मराठी शाळा (घाटकोपर), टिळकनगर तेलगू शाळा.

पालिका शाळांतील घटती पटसंख्या
वर्ष------------एकूण विद्यार्थी ----------उपस्थित विद्यार्थी 

2006-----------4,21,941----------------3,83,360
2007-----------4,12,670-----------------3,69,306
2008-----------3,89,086------------------3,63,377
2009----------3,72,759------------------3,50,377
2010-----------3,68,901------------------3,51,716
2011------------3,62,283-------------------3,44,328
2012--------------3,65,119----------------3,26,274

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad